गंधा (सुगंधा) आणि राजा दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का? अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,
'' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला.... ग ''
'' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे...'' गंधा म्हणाली.
'' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' ... राजा म्हणाला.
फक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. मग मनमुराद पणे बोलणे सुरु झाले. म्हणजेच गप्पा सुरु झाल्यात.
बोलत बोलताच ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते. सुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,.......
'' गंधा ... एक गोष्ट विचारू?''
तिने डोळ्यांनीच होकार दिला.
माझ्याशी लग्न करशील?'' त्याने सरळच तिला विचारले.....
तेव्हा गंधा काय बोलणार होती...........
त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.
अरे............ राजा मी अजुन तसा काही विचार नाही केलाय रे ...( मनातील विचार)
राजच हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.
आपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...
पण ती 'हो' म्हणेल की 'नाही'?...
तो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.
आपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली?...
ती जर 'नाही' म्हणाली तर?...
त्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.
थोड्या वेळाने ती म्हणाली,
'' चला आपल्याला निघायला पाहिजे..''
तिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते...
पण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...
पण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.
'' गंधा ... तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.
'' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.
पण तोही काही कमी नव्हता.
'' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''
ती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.
'' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली.
आपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.राजाचा आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले....
टिप: वरील कथानक हे श्री बाबासाहेब लोखंडे ह्याच्या जवालिक ह्या पुस्तकातील आहे
मला ते कथानक खुपच आवडले .म्हणून मी थोडक्यात ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हला आवडल असेल अशी मी आशा करतो ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook