पहिली भेट, पहिल्या परिक्षेसारखी!
उत्तराची वाट पाहणाऱ्या अगतिक प्रश्नासारखी...

पहिल्या भेटीत..
एकमेकांची नजर चुकवून
एकमेकांना पहायचं असतं,
स्वत: मात्र साळसूदपणे
चेहेऱ्याआड लपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अगदी सावधपणे वागायचं असतं,
हसतानाही चेहेऱ्यावरचं
खोटं गांभीर्य जपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
एकमेकांना समजायचं असतं,
निदान जे समजलं नाही
तेच कळलंय असं दाखवायचं असतं!

पहिल्या भेटीत..
अनेक शंकांचं ओझं वहाय्चं असतं,
'त्याच्या' सोबत आपणही स्वत:ला
अपेक्षांच्या तराजूत तोलायचं असतं!

पहिल्या भेटीत..
मनातून खूप काही बोलायचं असतं,
नेमकं अशाच वेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायचा असतं!

पहिल्या भेटीत..
सतत घड्याळ निरखायचं असतं,
एकमेकांच्या काट्यांमध्ये
इतक्या लवकर गुंतायचं नसतं!

पहिल्या भेटीत..
त्याने "काय घेणार?" विचारायचं असतं,
मग ती मेनू कार्ड पाहताना त्यानं
हळूच खिशातलं वॉलेट चाचपायचं असतं!

पहिल्या भेटीत..
'ती' जे काही मागवेल,
ते 'त्यानं' मुकाट्यानं खायचं असतं
नाही आवडलं तरी,"किती छान डीश आहे!"
असं आवंढा गिळून म्हणयचं असतं,

Post a Comment Blogger

 
Top