कुणीतरी लागतं
आपल्याला वेड म्हणणारं,
वेड म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला साथ देणारं,
पडत असताना अलगद तोल सावरणारं,
कुणीतरी लागतं आपलेपण जाणणारं,
सुख-दूःखाच्याक्षणांना ह्रदयात साठवणारं,
कुणीतरी लागतं
नातं जपणारं,
नात्यातील अश्रुंची
किंमत जाणणारं,
कुणीतरी लागतं आपल्याला आपलं म्हणणारं,
दूर राहूनही
आपलेपण जपणार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook