देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,
डब्बा, वाटरबैग, पाटी अन दप्तर,
कम्पास, लेखन, पेन्सिल अन रब्बर..,,
गावचा फाटा, तिथून शालेची वाट,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

हातभर अंतर ठेउन प्रार्थनेची रांग,
लेझीम चा आवाज, 'झिंक ,'चाक,"झ्यांग",
विश्राम!, सावधान..!, उभा राय ताठ,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

जेवणाच्या सुट्टीत 'वाटना-वाटणी',
भाकरीच्या बदल्यात टमाटयाची चटनी,
जेवाच्या पहिले धुवा लागते हात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

बे एक बे, बे दुने चार,
गणिताच्या तासात, पोट्याइचा भागाकार,
किती खाल्ला मार, तरी पाढे नाही पाठ,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

चिंचा, बोरं अन पोंगा-पंडित,
बर्फाचा गोला,'गोड लगे थंडित,
संत्र खावुन-खावुन आम्बटलेले दात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

मन लावून अभ्यास करीन,
पहिल्या बाकावर बसून, मास्तरच आइकिन,
पाढे पाठ करीन, रोज करीन गृहपाठ..,,
एकदा, फ़क्त एकदा, देवा शाळेत नेउन टाक,,,
मले शाळेत नेउन टाक,,,, ,,, ,, , . . !

Post a Comment Blogger

 
Top