इच्छा होती माझी
ती सांगेल तसे हसत हसत
जगण्याची इच्छा होती माझी...
माझ्या बरोबर राहण्याची
तयारीच नव्हती तीची...
प्रत्येक गोष्ट तीची हसत हसत
एकण्याची इच्छा होती माझी...
मला काही मनातल सांगावे
गरजच नव्हती तीची...
ती मागेल ते सारे हसत हसत
देण्याची इच्छा होती माझी...
हृदयच काय श्वाश ही सोडण्याची
तयारी होती माझी...
माझ्या कडून काही घ्यावे
इच्छाच नव्हती तीची...
कधी तरी मला समजावून घ्यावे
हीच तिच्या कडून इच्छा होती माझी...

Post a Comment Blogger

 
Top