एकटेपणाचं दु:खं सतत
किती दिवस सहायचं,
जुन्या आठवणींना अजूनकिती दिवस आठवायचं.
मी हि आहे रे इथे बैचेन
तुझ्यासारखीच ह्या पावसात,
पण कधी रे येणार सांग ना
तुझ्याही ते सर्व ध्यानात.
तु हि जरा जाणून घे रे
माझ्या मनातील भावना,
घायाळ ह्रदयावर प्रितीचे औषध
तू लवकर येवून लाव ना.
- संतोषी साळस्कर.
Post a Comment Blogger Facebook