प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
ओठान्मधे इतके सामर्थ्य नव्हते,
तुला दूर जातान्ना पाहूनही ते उघडले नाही,
ते फक्त कवितेतच कर्तुत्व दाखवतात.
प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
तुझ्या डोळ्यासमोर हरले माझे डोळे,
ऎवढ्या सात वर्षातही ते 'चुकले' नाही,
ते फक्त कागदच्या तुकड्यावरच बोलतात.
प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझा स्पर्शही तुला सान्गु शकला नाही,
तुला 'त्या'च्याबरोबर पाहुनही हाताने सीमा राखली होती,
ते फक्त कल्पनेतच जागे होतात.
प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळाला,
माझ्या श्वासही खोटेच बोलत होता,
शरीराचा अन्त पाहुनही ते वळले नाही,
ते फक्त 'पडद्यावरच' वळतात.
तु फक्त 'लाल-हिरव्या कागदासाठी' माझा हात सोडला,
तोच तुला माझ्या प्रेमपत्रापेक्षा जवळचा वाटला,
तेव्हा मीही तो प्रेमाच्या तराजुत तोलला,
आजतर मलाही ह्र्दय हलके वाटायला लागले,
पण आता फार उशिर झाला होता,
प्रेमाचा अर्थ मला फार उशिरा कळला होता...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook