काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

Post a Comment Blogger

 
Top