इतकी का सुन्दर दिसतेस तू...
मी विचारल्यावर
हळूच गालात का हसतेस तू...
उघड कधीतरी हे रहस्य
ही कसली जादू केलीस तू...

तुझ्यातच माझं मन रमत
तुझ्या सहवासताच ते हसतं
का समजुन घेत नाहीस तू...
इतकी का सुन्दर दिसतेस तू...

मनाच्या चित्रात रंगवल य तुला
प्रत्येक कवितेत कोरलय तुला
नाही भेटत कधी मला तू...
तरी खुशाली का पुसतेस तू...
इतकी का सुन्दर दिसतेस तू...

डोळे बंद करताच येतेस तू...
डोळे उघडताच जातेस तू...
एवढच तुझं माझं नातं
नसतानाही माझ्या सोबत असतेस तू...

Post a Comment Blogger

 
Top