नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!
पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!
व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!
मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीएससी चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!
विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook