आयुष्य हे समुद्र आहे,हृदय हा किनारा आहे,

आणि  मित्र म्हणजे लाटा आहेत.
समुद्रात किती लाटा  आहेत हे महत्वाचा नसून,
त्या किनारयाला किती स्पर्श करतात ते महत्वाच असत

 तू येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही...
पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही...!


पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे,
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे..!


रातराणी उमलावी तशी तु उमलतेस,
माझ्या मनांत मनापासुन दरवळतेस..
खरं सांगु का ग तुला ?
तु मला मनापासुन खुप खुप आवडतेस..!



माझ्यापासुन दुर गेल्यावर
माझी आठवण काढशील ना?
काही बोलावसं वाटलं तर,
मोबाईलवर एक फोन करशील का?

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत.... 




Post a Comment Blogger

 
Top