सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मलेली तू
इथ मात्र चमच्यापासून संसार उभा केलास?

वीस बाय वीस च्या किचनमधे वावरणारी तू
इथ मात्र दहा बाय बाराच्या चौकटीत रममाण झालीस?

सुखाच्या पलीकडच्या विश्वाची सोबतीण होतीस
इथ तडजोडीलाच सुखाचा आकार दिलास?

हाती घेतलेल काम पूर्ण कराव अस सांगणारी तू
आम्हाला मात्र अर्ध्या प्रवासात सोडून गेलीस?

जन्मभर थोरामोठ्याना आधारस्तंभ वाटलीस
तुझ्या लाडक्या चिमण्याना मात्र निराधार करून गेलीस?

जन्मभर जिद्दीने जगालीस
त्या मृत्युपुढे मात्र हतबल झालीस

आपल्या लाडक्यांसाठी कष्टाच ओझ वहात राहिलीस
त्यांच सुख अनुभवायला का थांबली नाहीस?

खाच खळग्यातून अवघड वळणावरून बाबाना पुढे आणलस
पायवाट सोपी दिसू लागताच मागे का वळलीस?

कष्टापासून दूर ठेवणार होतीस ना आम्हाला
मग या कोवळ्या खांद्याना तुझ ओझ उचलायाचे कष्ट का दिलेस ?

माझे एवढे प्रश्न अनुततरीत ठेऊन गेलीस
शेवटी एका प्रश्नाच उत्तर दे आई

तू एवढी चांगली का होतीस
की त्या ईश्वरालाही प्यारी व्हावीस?

Post a Comment Blogger

 
Top