काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू नव्हे. तसेच कालसर्प हा योग आहे, दोष नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे. एकूण 12 प्रकारचे विशेष योग असतात. या योगाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालासर्प योग म्हटले जाते.

लाल पुस्तकातील पहिल्या भावात राज सिंहासन तर सातव्या भावात विवाहाचे घर दिले आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी या दोन्ही भावात राहु आणि केतू यांचे साम्राज्य होते. अर्थात जर सिंहासन असेल तर विवाह नाही आणि जर विवाह असेल तर सिंहासन मिळणार नाही. चुकून कोणी विवाहीत व्यक्ती देशाच्या सिंहासनावर बसला तर त्याची शिक्षा देशातील प्रजेला भोगावी लागेल, असे समजले जाते. परंतु, हा विषय संशोधनाचा आहे. मागील जन्माच्या कार्यामुळे हा योग सर्वांचा कुंडलीत 12 प्रकारे दर्शविला जातो. ज्याला कालसर्प योग आहे, त्याचा प्रभाव वयाच्या 45 वर्षपर्यंत राहतो. त्यानंतर त्याचा प्रभाव समाप्त होईल.

कालसर्पयोगचे निदान आणि उपाय
1 * प्रथम भावात राहू आणि सप्तम भावात केतू असेल तर चांदीची गोळी आपल्याजवळ ठेवावी.
2 * द्वितीय भावात राहू आणि अष्टम भावात केतू असेल तर दोन रंग किंवा त्यापेक्षा जास्त रंग असलेले ब्लँकेट दान करावे.
3 * तृतीय भावात राहू आणि नवव्या भावात केतू असेल तर सोन्याचा वापर करावा. डाव्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी घालावी किंवा वाहणार्‍या पाण्यात हरभरा दाळ टाकावी.
4 * चतुर्थ भावात राहु आणि दहाव्या भावात केतू असेल तर चांदीच्या डबीत मध घालून घराच्या बाहेर जमिनीत गाडून टाकावे.
5 * पाचव्या भावात राहू आणि अकराव्या भावात केतू असेल तर चांदीची अंगठी हातात घालावी.
6 * सहाव्या भावात राहू आणि बाराव्या भावात केतू असेल तर बहिणीची सेवा करावी. ताज्या फुलांना आपल्याजवळ ठेवावे. कुत्रा पाळावा.
7 * सातव्या भावात राहू आणि प्रथम भावात केतू असेल तर लोखंडाच्या गोळीला लाल रंग देऊन आपल्या जवळ ठेवावे. चांदीच्या डबीत वाहते पाणी भरून त्यात चांदीचा एक तुकडा टाकून ती डबी आपल्या घरात ठेवावी. या डबीतील पाणी सुकायला नको, याकडे लक्ष ठेवायला हवे.
8 * आठव्या भावात राहू आणि द्वितीय भावात केतू असेल तर आठशे ग्रॅम नाण्याचे आठ तुकडे करून एकत्र वाहत्या पाण्यात टाकून द्यावे.
9 * नवव्या भागात राहू आणि तृतीय भावात केतू असेल तर हरबरा दाळ पाण्यात प्रवाहीत करावी. चांदीची वीट बनवून घरात ठेवावी.
10* दहाव्या भावात राहू आणि चौथ्या भावात केतू असेल तर पितळच्या भांड्यात वाहत्या नदीचे पाणी भरून घरात ठेवावे. त्यावर चांदीचे झाकण असल्यास अतिउत्तम.
11 * अकराव्या भागात राहू आणि पाचव्या भावात केतू असेल तर 400 ग्रॅम नाण्यांचे 10 तुकडे करून वाहत्या पाण्यात टाकून द्यावे. त्याचप्रमाणे 43 दिवसापर्यंत गाजर आणि मुळे झोपताना आपल्या जवळ ठेवून सकाळी मंदिरात दान करावे.
12 * बाराव्या भावात राहू आणि सहाव्या भागात केतू असेल तर लाल रंगाच्या थैलीत बडीशोप भरून ते बेडरूममध्ये ठेवावे. थैलीचा कपडा चमकणारा असू नये.

इशारा : वरील सांगितलेले उपाय लाल पुस्तकाच्या कोणत्याही ज्योतिष्याच्या सल्ल्यानुसारच करावे.

Post a Comment Blogger

 
Top