मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
तीची प्रत्येक अदा माझ्या वेड्या मना भावली
मला खुप गर्व होता माझ्या प्रेमावर
आता फ़क्त हसुन पाहतोय त्या गर्वाच्या राखेवर
प्रेम करणं कुठे जमलं मला
सांगुच नाही शकलो कधी मनातलं तिला
पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली
“कधी कुणावर प्रेमं नको करुस” हे मात्र सांगुन गेली
जाताना तीने माझ्याकडे तीची आठवण मात्र गहाण ठेवली
जगण्याची तेव्हा ईच्छाच नव्ह्ती उरली
तिच्या त्या आठवणींना शब्दांनी आसु, एकटेपणाने साथ दिली
पण त्याचवेळी ही कविता मला भेटली
“एक गेली तर दुसरी येतेच”
ही म्हण आज जणु पुन्हा सार्थ ठरली
तिच ती शब्दसुदंरी मला खूप आवडली
मैत्रीचा हात पुढे करता तिने लगेच मैत्री स्वीकारली
ति गेल्यावर मी अंधारातच भटकत होतो पण
हिने माझ्या आयुष्याची विझली वाट पुन्हा पेटवली
ती मला दुख:त खोलवर बुडवुन गेली
पण आज हीने मात्र
मला त्या डोहातही आनंदाने पोहण्याची कला शिकवीली
या कवितेने मला जगण्याची ही नवी भाषा शिकवीली
आज असं वाटलं की
मीच खरंच जिंकलोय आणि ती हरली
कारण दु:खाबरोबर चालताना
सुखाची वाट मी या कवितेसोबत शोधली………,
मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook