एक सांगु तुला
खरं खूप आवडते मला !
तुझं ते मोकळे केस बांधणं
केस बांधताना हेअर बँड दाताने पकाडणं
दोन्ही हात केसावरून फिरवताना ,
तुझं ते किंचीत मागे रेलणं
प्रत्येक केस अन केस एकत्र केल्यावर
तू तुझी नाजूक मूठ त्याच्या भोवती वळवणं
मग दाताल्या हेअर बँड चे
एका हाताने दोन वेटोळे करून
मुठीत जमा केलेल्या केसांभोवती
ते अडकवणं
आणि मग हलकेच एकदा डावीकडे
आणि उज़वीकडे मान झटकणं
आणि त्या टॉपळयाने
तायलयीत हिडकणे
एक सांगु तुला
खर खूप आवडते मला !
तुझ ते पोळ्या करणं
पिठात पाणी घालून
दोन्ही हाताने ते कालवणे
अवचित कपाळावर आलेले
केस मागे सारताना
हात पालथा करून
ती व्यवथित काना मागे अडकवणं
कणीक पूर्ण मळून झाल्यावर
तू तुझ्या नाजूक हाताने बनवणं
बरोबर एकाच मापाचे
बरेच तुकडे करून
प्रत्येक तुकडा
तुझ्या नितळ पंजामधे घोळणं
हे सर्व करताना तुझ अंग अंग थिरकणं
अशा बर्याच गोष्टी करताना
मला तू बेहद आवडयची
जे तू तुझ्या सुंदर हाता ने करायची
पण एका अपघाताने
तू तुझे दोन्ही हात गमावलेस!
आणि डोळ्यात साठवलेलया गोष्टी
आठवण्याचे दिवस आणलेस!
आता गेली कित्येक वर्षे ,
मीच या सर्व गोष्टी करतो
मी तुझे केस विंचरतो
मी पोळ्या करतो
पण एक गंमत सांगु तुला
खर खूप आवडते मला !
तुझं ते वीनातक्रार मजकडून
वाटेल तसे केस बांधून घेणे
तू ते वीनातक्रार
मी केलेल्या कच्च्या पोळ्या खाणं
पण एक गोष्ट अजिबात आवडत नाही मला
तूला भरवताना
प्रत्येक घासाचे अश्रूंत भिजणं,
तुझ्या आणि माझ्या ही
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook