घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला
चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात
रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........
नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही .....
तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती
आणि मी वेडी झाली म्हणुन
तू सोडून गेलास .......
काय सांगू तुला
जग माझ्यावर हसतं
तुझ्यासाठी वेडी झाली
असं उगाच बोलतं.......
मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं
Post a Comment Blogger Facebook