Image by ArenaFlowers.com via Flickr
गुलाबाचं फुल , मोगर्‍याचं फुल
चाफ्याचं फुल , शेवंतीचं फुल
किती किती फुलं खोवली आहेत तिने डोक्यात
कळेना ..
हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ?
.............................................................................
माझ्या हृदयाच्या बॅन्केत
तुझं खातं उघडावं
म्हणून मनाचा मॅनेजर
तुझ्याकडे कितीदा येऊन गेला
तू म्हणालीस माझं अगोदरच
दुसरीकडे फिक्स डिपॉझीट्चं अकाऊंट आहे !

मग सखे ,
साधं करंट अकाऊंट
उघडलंस तरी चालेल मला !!
.............................................................................

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र

.............................................................................

भूगोलाच्या मास्तरांना कळेना
मुलांचा इतिहास
अभ्यास न करताही
पोरं कशी होतात पास ?

.............................................................................

डासांचा मज वाटे हेवा
सुंदरीच्या गालाला
घेता येतो चावा

.............................................................................

फुलराजाने फुलराणीला फुलांच्या फुलदाणीत फूल देऊन शुभेच्छा दिल्या.
तो म्हणाला, 'हे फुलराणी, तू फुल टू ब्युटीफुल, वन्डरफुल आणि सगळ्या फुलात कलरफुल.
माझ्या भावना आहेत खऱ्याखुऱ्या. समजू नकोस त्याला एप्रिलफूल.'

Post a Comment Blogger

Top