प्रेम करताना विचार नाही केला
मला प्रेम मिळेल का?
तू माझी होशील का?
माझ्यावर प्रेम करशील का?
माझ्या या निरास जीवनात नंदनवन फुलेल का?
मनापासून.............मनावर....................
प्रेम करताना कसला विचार करायचा नसतो.
विचार करून कधी प्रेम मिळत नाही........
मी प्रेम केलं...............
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मनमोकळेपानावर
आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावावर
मी प्रेम केलं..........
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
मासोळी डोळ्यातील बोलकेपनावर
तुझ्या चेहऱ्यावरील निरागसतेवर
आणि तेवाद्याच शांत मनावर
मी प्रेम केलं....................
तुझ्या कधी तरी रागावन्यावर
रागाने लाल झालेल्या त्या नाकावर
लटके नाक मूरदन्यावर
आणि गाल फुगवून बसण्यावर
मी प्रेम केलं....................
तुझ्या इश्य म्हणन्यावर
तरुण्यासुलभ लाजन्यावर
लाजून झुकणाऱ्या नजरेवर
आणि गुलाबी झालेल्या गलावर
मी प्रेम केलं....................
तुझ्या स्वप्नावर,इच्छा,आकाक्षावर
तुझ्या मनातील भावनांवर
तू सोसलेल्या वेदनांवर
आणि जीवनातील दुखावर
मी प्रेम केलं....................
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर
हृदयातील स्पन्दनावर
माझ्या आठवणीत तू
जागून काढलेल्या रात्रीवर
मी फक्त प्रेम केलं कारण................
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने..........
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.........मनावर
कधीतरी मलाही असंच प्रेम मिळेल
खर प्रेम करणार कोणीतरी भेटेल
मी फक्त प्रेम केलं
मलाही फक्त प्रेम मिळावं
मलाही फक्त प्रेम मिळावं
--
With Lots Of Love
Sachin Haldankar.
Post a Comment Blogger Facebook