संता- बंता .......... Santa - Banta jokes :)

संता : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता : वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?

संता : त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय.

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत. अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. तो वैतागून शिट्टी वाजवतो.
बंता त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस. आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

पाडव्याचं गिफ्ट हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते. दोघे ज्वेलरी शॉपमध्ये जातात. तिला हिरा असलेली अंगठी आवडते. संता हळूच किंमत विचारून घेतो. दुकानदार सांगतो दहा हजार. एवढी किंमत ऐकून संता शिट्टी वाजवतो. गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो. दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया.

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

संता ऑफिसात आला. त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, 'काय हे?' संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.

बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.

संता बापुडवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट ठेवलाय.

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?

संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली.

बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?

संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही.

♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥ ♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥♡♥ Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ ♥

Post a Comment Blogger

Top