रोज रोज देशील एसएमएस तू पाठवून
आतुरतेने हसत तो काढेल ती वाचून
मेमरी फूल झाली की टाकेल डिलीट करून
म्हणुनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगुन!

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवून
एक दिवस येईल गुलकंदाची बरनी घेवून
लग्न ठरते म्हणत ती जाईल ती निघून
म्हणुनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगुन!

किती दिवस थांबणार तू बोलाल्यावाचुन
एक दिवस येशील एकट तिला गाठून
रडताच निघेल ती पत्रिका हातात देऊन
म्हणुनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगुन!

जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन
मारशील तू अक्षता नवरयाला फेकून
बघशील तेव्हाही तिला चोरून चोरून
म्हणुनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगुन!

कधी तरी दिसशील तिला रस्त्यावरून
थांबवेल तेव्हा तुला ती एक हाक मारून
विसराशिर तू स्वतालाच तीच बाळ पाहून
तीच म्हणेल तेव्हा तुला
"एकदातरी...बघायच होतस मला सांगुन!!...."

Post a Comment Blogger

 
Top