सगळ्यान मध्ये तू असलास तरी
माझ्यासाठी तू ख़ास आहेस .....
माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
तुला सगळ माफ आहे ......

शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....

जगणं असह्य झाल्यावर
मरणही उशिरा येते
दुःख अजुन बाकी आहे
हे तेव्हा कळून येते

डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।

तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते ......

तू मला फसवणार होतास कधीतरी



हे आधीच मला माहीत होत
पण बर झाल मला अद्दल घडली
हे मनच माझ मानत नव्हत ........

घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो.....

तुझ्या आठवणी आठवण्याचा
रोग लागलाय मला
तुझ्याकडचं विसरण्याच
औषध दे मला

तुझ्या पासून दूर जाताना
मन जड़ झाले होते
चेहरा हसरा दाखवला तरी
डोळे भरून आले होते ...

मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
तू एक आहेस .....
पण तुझी इच्छा मी का करू ???
तू तर माझाच आहेस....






Post a Comment Blogger

 
Top