तीचं मायं एकदम सेम व्हतं
अन् खान्या-पिन्या घुमन्याच्या मामल्यात
खिशाले काही नेम नव्हतं ।
कधी म्हने सिनेमा,कधी म्हने बगिचा
अन् माया पैशावर तीची अशी चालली होती मजा ।
माई नजर फसलि , मले ते गाय वाटलि
पन गाय् कुठं, ते त म्हैस निघलि,
मले सोडुन ते दुसर्या संग गेलि
सांगतो सगळी हकिकत काय झाली॥
एक दिवस मग वॅलेंटाईन आलं
मीनं तीले एक फुल देल्ल
तीनहि ते ठेवलं
माया मनात त मंग कस-कसच झालं
मीनं आय लव यू म्हनाच्या पयलेच
ति म्हनलि थँकू
तसबि मले एक फूल पायजे व्ह्तं
माया नव्या बॉय फ्रेन्ड ले मले ते द्याचं व्हतं
माया समोरच तीनं त्याले बोलावलं
एक हात हातात घेवून दुसर्या हातात फूल् देल्ल ॥
मायं मन असा जळवून गेला
अन् तो हल्या,
माया म्हशिले माया समोरुन घेवून गेला ॥
असं मायं मन तोडून् गेलि
मायं फूल् त्याले देवून,
मले फूल् बनवुन गेली ॥
तवाच मले दूसरी दिसली,
तीच्या नजरेत नजर ठसली
आता,नवं नवं प्रेम आहे
अन् काय सांगू राजेहो
माया मनत त कस-कसच होत आहे,
कस-कसच होत आहे ॥
Post a Comment Blogger Facebook