रात्री झोप नाही लागली
जीव कासाविस झाला...
सकाळी उठलो,
डोळे चोळत कॉमप्यूटर चालू केला
आई ओरडली....अरे
दात घास, आंघोळ तरी कर
ऑरकुट लोग इन केला
तिचा हसरा चेहरा पाहिला
मागून आईचा धपाटा......
मेल्या.....सकाळी सकाळी
पोरिंचे फोटो बघतोस
बघतेच कसा दात नाही घासतोस
कळवळत उठलो.....
मोरित घुसलो.....बादली भरलेली
भसाभसा पाणी अंगावर घेतलं
कपडे बदलले, बाहेर आलो
तसा परत.........धपाटा
कार्ट्या दात नाही घासलेस
पोरीच्या नादाने वेड़ा झालास
साबण पण नाही लावलास
आयला......आत्ता दिवसभर
अंगाला वास येणार.....
आंघोळ करून काय उपयोग.....??
तिच काय कोणती पोरगी जवळ नाही घेणार
कसाबसा परत कॉमप्यूटरजवळ गेलो
ती गायब झालेली......
मोनिटर हलवला......सी पी यु ठोकला
च्यामारी......लाईटच गेलेली.
आत्ता ती कशी भेटणार
ना तिचा नंबर माझ्याकडे
ना माझा तिच्याकडे......
आठवण काढत तिची काळजाला जातील तडे
चला आत्ता ज़रा......
दात तरी घासून घेवू
आयला......पोरगी गेली
आजचा दिवस आईला खुश ठेवू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook