लग्नाच्या वाढदिवसानिमित्त.....

बसंती काकू, शामराव काकांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुद्दाम डीवीडी प्लेयर विकत आणला आणि दोघांचा ऑल टाइम फेवरेट 'शोले'ची डीवीडीही. त्या दिवशी आजी आजोबांकडे त्यांचा नातू चिंटू राहायला आला होता. मग त्या रात्री तिघांनी मिळून 'शोले' एन्जॉय केला.

तो संपल्यावर काका एकदम जुन्या काळातल्या आठवणीत रमले आणि एकदम रंगात येऊन काकूंकडे पाहत म्हणाले : नाच बसंती नाच!

काकांचा आवेश पाहून काकू लाजून काही तरी बोलणार, एवढ्यात छोटा चिंट्या जिवाच्या आकांताने ओरडला : बसंती... इस कुत्ते के सामने मत नाच!  :)

Post a Comment Blogger

 
Top