तु कधी गोड दिसायचीस
मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु हळुच लाजायचीस
आणि लाजुन हसल्यावर
गोडच गोड दिसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी रूसायचीस
तुला मी नकटे म्ह॑टल्यावर
तु गाल फुगवुन रूसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी हसायचीस
तुला टपोर्या मोगर्याचा गजरा दिला की
तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी जळायचीस
तुझ्या मैत्रिणीला मी
गाडीवरून घरी सोडायचो
तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !!
तुला माहित आहे
तु कधी भाव खायचीस
तुला कोणी प्रपोज केले की
तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे
असे सा॑गुन जायचीस
आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
Post a Comment Blogger Facebook