प्रिय मैत्रीणीस मझ्या...

नेहमी वाटायच आपल कुणीतरी जीवाभावाच असाव.मायेचा ओलावा अन मैत्रीची ऊब देणारी. आपल्या भावना जाणणारी आपल्या विचारंना जाणणारी. अशी एक तरी मैत्रीण आसावी,जी आपल्याला आत्मीयतेने ऐकुन घेईल अन दिलासा देईल. खुप शोध घेतला पण अपयशच.........! शेवटी तु भेटलीस अन मन आगदी आनंदुन गेल.जणु मझ्या सारख्या सामजीक प्रदुशणाच्या वाळवंटात भरकटलेल्या वाटसरुला मरुद्यान दिसले अन माझी दिवसांची तहान भागली.

तशी मला कधीच कुणाची वाट पहायला आवडत नाही. पण तरीही दोनच गोष्टीची वाट बघतो. एकतर माझ्या अंगणातल्या गुलमोहराला लागणारर्‍या पिवळसर तांबड्या फ़ुलांची अन दुसरी म्हणजे तुझीच. तुझी आठ्वण मला आनंदुन टाकते,बहरुन टाकते.

म्हणुनच तुझ्या रुपात एक जीवाभावाची सोबती मीळाल्या सरख वाटत व तुझ्या मैत्रीच मोरपीस ह्रदयाच्या एका सोनेरी कप्यात जपुन ठेवावस वाटत.

अशीचनेहमी माझ्या सोबत रहा आणि माझ्या अंगणातल्या गुलमोहरा सारखी अशीच नेहमी फ़ुलत रहा.

.................तुझा प्रिय मित्र...................

Post a Comment Blogger

 
Top