दाटलेला पाउस आणि ओल्या मातीचा वास
प्रथमच एका छ्त्रीत आपला सहवास
सारं विसरलास का रे?

गच्ची पर्यंत बहरलेला प्राजक्ताचा वेल
पहिल्या चुंबनाची कांचनमय वेळ
सारं विसरलास का रे?

एकमेकांच्या हातात हात आणि तो रमणीय सूर्योदय
तुझी छबि असलेल माझं कोमल ह्रदय
सारं विसरलास का रे?

तुझ्यासाठी केलेल्या असंख्य कविता
रात्र जागुन तुझ्यासोबत मारलेल्या गप्पा
सारं विसरलास का रे?

तुझ्या वाटेकडे लागलेले माझे पाणावलेले डोळे
तू दिसताच तुझ्याकडे धावत येणारी माझी पाउले
सारं विसरलास का रे?

तुझ्यावरला माझा अखंड विश्वास
आश्रू माझे पुसशील असा खात्रीचा श्वास
सारं विसरलास का रे?

अबोला धरलास माझ्यासवे जर
अनंताला भिडण्याचा माझा निर्धार
सारं विसरलास का रे?

Post a Comment Blogger

 
Top