कोल्ड कॉफी
आठवत तुला तु नेहमीच असा यायचा...
आज आलास ना तसाच ....घोंगाळणार वादळ....
नको ही पण तु हवा हवासा.....

आलास कि मला तुझ्यात लपेटुन घ्यायचा...
नकळत मी ही सामावयचे तुझ्यात.... तुझ्या मोहात...
अन तु विणत रहायचा तुझ्या कोळ्याच जाळ

किती असायच सांगण्यासारखं माझ्याकडे
तुझ बोलण संपायचच नाही....
बघत रहायचे तुझ्याकडे... पापणी लवायची नाही

तु बसायचा वाफाळलेली कॉफी घेवुन...
अन मी गुंग तुझ्या हासण्यात , तुझ्या माथ्यावर येणा-या बटांत
मध्येच मिचकवणा-या डोळ्यांत ....

हळु हळु वादळ शमायच....
निरोप घ्यायचास तु.... जाताना सांगायचास
''छान होती हो कोल्ड कॉफी''

आज ही हातात ''मग ''घेवुन वाट बघतेय
वादळाची अन कोल्ड कॉफीची

Post a Comment Blogger

 
Top