सॉफ्टवेअर डार्लिंग

सॉफ्टवेअर इंजीनियर सदू एके दिवशी इतका रोमँटिक झाला
की त्याने चक्क कम्प्यूटर स्क्रीनवरून डोळे वळवले
आणि आपल्या बायकोकडे पाहिले.
तिला ओळखायला थोडा वेळ लागला त्याला- पण,
ओळख पटताच तो म्हणाला, ''डार्लिंग, मी तुझ्यासाठी फुलं आणलीयेत बघ.''
'' कुठायत?''
आपल्या नव-याशी सुमारे दीड महिन्यानंतर पहिल्यांदा बोलण्याची संधी लाभलेल्या सरिताने विचारले.
'' ही काय, स्क्रीनवर'',
सदू आनंदाने चीत्कारला, '
'तुझ्यासाठी फ्रेश फुलांचा वॉलपेपर सेव्ह केलाय मी!''
त्याच्या टाळक्यावर प्रोग्रॅमिंगविषयक पुस्तकाचा दीड किलोचा ठोकळा आपटून बायको म्हणाली,
''गाढवा, तुला हे कधी कळणार की बायकांना अशा फुलांच्या चित्रांमध्ये इंटरेस्ट नसतो. प्रत्यक्ष स्पर्श महत्त्वाचा असतो त्यांच्यासाठी.''
सुमारे दोन मिनिटे विचार करून सदूने फणकारून आत गेलेल्या सरिताला हाक मारली आणि विचारले,
''मग तुला मी प्रिंटआऊट देऊ काय?!!!!!'' 

Post a Comment Blogger

 
Top