एकदा महाराज मला भेटले,
झोपेत पाहून जोरात कडाडले ,
"अरे मावळ्या झोपतोस काय?,
कोम्ब्डा अरवला ऐकू येत नाही काय?",
"महाराज हयात दोष माझा नाय ,
थंड AC आणि गजराच्या युगात,
कोम्ब्डया च महत्व तरी काय?"
महाराज हसले अणि म्हणाले ,
"चल भवानी मातेच दर्शन घेउया,
ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया"
दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले,
शेवटी रायगडा वर येउनी स्तब्ध राहिले,
म्हणाले,"काय रे दशा झाली या किल्ल्यांची आज?
ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज!!!
मी म्हणालो ,"महाराज, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज?
रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...!
महाराज विचलित झाले,
म्हणाले,"चल येथून जाऊ यात ,
महाराष्ट्राची राजधानी पहुयात",
महाराजान्सोबत मुंबईत आलो,
तिथल्या झगमगाटात पूर्णपणे हरवलो,
मुंबई बघता बघता २६/११ च प्रसंग ऐकविला,
तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला,
"तुम्ही त्या नाराधामाला जित्ता कैसा सोडिला?"
उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला ,
म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसब त्यानेच हा प्रसंग घडविला,
पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला नाही तो फक्त माणुसकीला ....!
वरून आमचेच नेते म्हणती,तुमचेच लोक फितूर ,
बलिदान गेले वाया , मरणयास होते आतुर...!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook