ए ए ए ए फसलीssss

फसली रे फसली
पोरगी फसली
कोरी कोरी
नवी नवेली
ऑर्कुट बावरी
जाळ्यात फसली..

स्क्रॅप्सचा मारा , कौतुकाचा चारा
प्रोफाइल तुझा कित्ती निराला
( कविता तुझ्या सुभानअल्ला
अल्बम तुझा तोबा तोबा )
फोनवरुन हळद फासली
चॅट करुन नादी लावली
ए ए ए ए फसलीssss

ये ये घरी, निरव दुपारी
वाट पाहे कवितांची वही
सये अशी तू मनी ठसली
लांडग्यानं कातडी कवीची पांघरली
ए ए ए ए फसलीssss

कच्च्या कैरीची भूक लागली
शब्दांच्या खेळी केली " मागणी "
हाताने नाय जर..तर डोळ्यांनी गिळली
आहे खुल्ली , चॅट विंडोची गल्ली !
ए ए ए ए फसलीssss

फसली रे फसली
जाळ्यात फसली
पोरगी फसली
कोरी कोरी
नवी नवेली
ऑर्कुट बावरी
जाळ्यात फसली..

Post a Comment Blogger

 
Top