पोरगी पटली रे पटली...
मी 'विजू', आपल्या गल्लीचा दादा,
ती 'पिंकी', माझ्या ह्रदयाची राणी...
व्हॅलेंटाईन ला तिला 'पक्या' ने छेडलं,
अन् गल्लीत सुरु झाली आणा-बाणी...
मी 'पक्या' ला धू-धू-धुतला,
त्याचा माज सारा काढून टाकला...
अन् त्याचेच पाकीट मारून,
सारा माल पंटरांना वाटला...
ती हळूच गॅलरीत आली,
खांबाआड लपून बसली...
अन् माझ्याशी नजर भिडता,
ती गालात खुदकन हसली...
झाली माझी कॉलर 'टाईट',
अंगी इश्काचं भिनलयं वारं...
तिचं रोज-रोज गॅलरीत दिसणं,
मला वाटू लागलं आहे प्यारं...
एकदा गाठलं तिला मी जिन्यात,
तशी लाजून लाल-लाल झाली...
चावली बोटं तिनं दातांनी,
अन् डोळे झुकवले खाली...
मी ठसक्यात हात तिचा धरला,
डायरेक्ट मागणी तिला घातली...
ती हळूच हो म्हणाली आणि,
पोरगी पटली रे पटली...
पोऽऽरगीऽऽऽऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽ रेऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽऽऽ!!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook