नवे जेव्हा मिळते, विसर पडतो जुन्यान्चा,
काय अधिकार असतो आपल्याला,
जुन्यान्ना आठवणीन्च्या कोन्दणात टाकण्याचा.....??

आठवणी असतात कधी गोड तर कधी कडू,
कशा काय अपेक्षा करतो आपण नेहमीच गोड गोड घटनान्च्या....?

एकेक घटना घडत असतात ....
कधी मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध !!
हा कसला अट्टहास प्रत्येकवेळी मनासारखे-मनाप्रमाणे घडण्याचा.....??

मनासारखे - मनाप्रमाणे प्रत्येकवेळी घडत नसते..!!

ज्याच्या त्याच्या मनासाठी-मानासाठी,
मनाला मुरड घालावी लागते !
जीवन सुसह्य करण्यासाठी
'तडजोडच' करावी लागते !!

Post a Comment Blogger

 
Top