तो रस्ता मला पाहून आज हसला


म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला


हो ती हवा आजही तिथेच होती


नेहमी तुझे केस विसकटणारी




तो गाडयाचां गलकाही तिथे होता


रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा


त्या वळणाने मला आवाज दिला खरा


पण आज मी मागे वळून पाहीलच नाही




रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या


आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही


आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला


आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत




पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी


आज एक युदध हरल्या सारख वाटत होत


आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच


रोज दोघं असतात पण आज हा एकच




उत्तर होत जरी एकटाच असलो तरी


तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला


पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज


असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...

Post a Comment Blogger

 
Top