नाते प्रेमाचे
या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकावर.......
पण, माझ्या प्रेमाला त्याचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही त्याच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते त्याच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
त्याला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
त्याच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी त्याच्यावर आजही
मनापासून प्रेम करते,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहते.
कळेल त्याला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...
कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook