देशपांडे
 आहेत का ?


फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)

पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..

दुसरा : बोला.

पहिला : देशपांडे आहेत का ?

दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!

पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.


संता एका पार्टीत


संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला. संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली -
आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी - सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.

हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी - सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली




विमानात सरदार


एकदा एका सरदाराला पहिल्यांदाच विमानात बसण्याची संधी मिळाली. तो आधी कधी विमानात बसला नव्हता त्यामुळे खुप उत्साहात होता. जसा तो बोईंग 747 मध्ये चढला तो उत्साहाने उड्या मारत, आणि एका सिटवरुन दुसऱ्या सिटकडे धावत ओरडायला लागला, "BOEING! BOEING!! BOEING!!! BO….."

त्याला जणू आपण कुठे आहोत आणि काय करीत आहोत याचा विसरच पडला होता. कॉकपीटमध्ये बसलेला पायलटही त्याच्या या ओरडण्याने त्रासून गेला होता. शेवटी चिडून तो पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्या सरदाराला जोरात रागावला, "BE SILENT!"

विमानात सर्वत्र स्मशानवत शांतता पसरली. विमानात बसलेले सगळे प्रवासी रागावलेल्या पायलटकडे आणि त्या सरदाराकडे पाहायला लागले. त्या सरदाराने दोन क्षण त्या पायलटकडे पाहाले, काहीतरी विचार केल्यासारखे केले आणि तो पुन्हा ओरडायला लागला, "OEING! OEING! OEING! OE…."

 

पर्याय.


एकदा एका खिसेकापूला कोर्टात हजर करण्यात आले.

न्यायाधीशांनी त्याला सहा महिने जेल किंवा दोन हजार रुपये दंड ठोठावला. तेंव्हा खिसेकापू चोराचा वकिल म्हणाला, "साहेब, माझ्या अशिलाला दंड भरायचा आहे, पण त्याच्याकडे फक्त एक हजार रुपयेच आहेत. तुमची परवानगी असेल तर तो या गर्दीत दहा मिनीटे फिरुन अजुन एक हजार रुपये आणु शकेल.

हच'चे नेटवर्क


एक लहान कुत्रं संताच्या मागे लागले होते. ते पाहून संता मात्र जोरजोरात हसत होता.

बंता- अरे यार, कुत्रं तुझ्या मागे लागले आहे आणि तुला काय इतके हसू येत आह. 

संता- बघ यार, माझ्याजवळ एअरटेलचा फोन आहे हे 'हच'चे नेटवर्क माझ्या मागे लागले आहे







Post a Comment Blogger

 
Top