उठल्या उठल्या घेतोस चहाचा कप,
अन पेपरातल्या बातम्या गिळतोस गपागप…
कितीही वाटली चीड,
तरी मन नसते निर्भीड..!


माणूस असूनही जगण्यास घाबरतो,
हातात बॅग घेऊन ऑफिसात धावतोस…
घर ते ऑफिस अन ऑफिस ते घर! हेच तुझे जग,
माणूस मरू दे नाही तर जग जळू दे तू असतोस निबोल खग..!

मोठ्या माणसांची हांजी हांजी,
राजकारण्यांची वाहजी वाहजी…
अशीच तुझी जिंदगी रे
कडक भाषा का? घरापुरती रे..!


प्राणाचा देह… निष्प्राण मनाने जगतो,
जगण्यासाठी कसा रे लाचार होतो…
रस्त्याचे खड्डे, दहशतवादाचे धक्के,
आता सर्वच सारखे…
कसे जीवन तुझे… तुला जगणेच पारखे!

आता तरी सांग मला
कधी तरी माणूस होशील का?
सुखासाठी अन शांततेसाठी
अन्यायाशी लढशील का?




Post a Comment Blogger

 
Top