मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले....
मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो, वेळ संध्याकाळची, तरी 7 वाजलेले, तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो. चहाचा एक झुरका घेतला तेव्हा, माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि 8/10 वर्षाची त्याची मुलगी येऊन बसली.शर्ट ही फाटका अगदी त्याच्यासारखाच, वरची दोन बटने गायब,मळकी पॅन्ट थोडी फाटकी, मजुरी करणारा वेट बिगारी असावा तो माणूस,मुलीने छान दोन वेण्या घातलेल्या,साधारण फ्रॉक पण स्वच्छ धुतलेला होता, तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल दिसत होते, ती हॉटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठे करून पाहत होती. डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुबगुबीत सोफा, ती अगदी सुखावली होती, वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी त्यांच्यासमोर ठेवलं, पोरी करता 1 डोसा आणा कि !!.त्या मुलीच्या बापाने वेटरला सांगितलं, मुलीचा चेहरा अजून फुलला, तुम्हाला नाय सांगितले !,असे मुलीनं बापाला विचारले, त्यावर बापाने मला काही नको, तो बाप वेटरची नजर चुकवत म्हणाला,
थोड्या वेळात वेटर डोसा,चटणी, सांबार वेगळं घेऊन आला. गरमागरम मोठा फुललेला डोसा खाण्यात ती मुलगी गुंग झाली, तो तिच्याकडे कौतुकाने पाहत पाणी पीत होता.. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला, आजकालच्या भाषेत डब्बा फोन.. तो मित्राला सांगत होता, आज पोरीचा वाढदिवस आहे तिला घेऊन हॉटेलात आलो आहे, शाळेत पहिला नंबर आला तर तुझ्या वाढदिवसाला मी हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन म्हणालो होतो. ती खाते डोसा.. श्वास घेऊन नाही र…. दोघांना कुठलं परवडतं, घरी पिठलं भाकर हाय मला गरमागरम!
चहाच्या चटक्याने मी भानावर आलो, कसाही असुदे श्रीमंत, किंवा गरीब बाप हा नेहमीच लेकीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल, मी काउंटरवर चहाचे आणि त्या 2 मसाला डोसा चे पैसे भरले, आणि सांगितलं अजून 1 डोसा आणि चहा तिथे पाठवा! पैसे का नाही असं विचारलं तर सांगा! आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना! तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना! आम्ही ऐकलं तुमचं बोलणं!!म्हणून आमच्या हॉटेल तर्फे खास तुमच्यासाठी, असाच अभ्यास कर म्हणावं याचं बिल नाही, पण फुकट हा शब्द वापरू नका, त्या वडिलांचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता, आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला, मी बाहेरून पाहत होतो, तो म्हणाला कावरा बावरा झाला, पुन्हा म्हणाला मी एकच म्हणालो होतो,तेव्हा मॅनेजर म्हणाले अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली! आम्ही ऐकलं ते म्हणून हॉटेल तर्फे आज दोघांनाही फ्री!!!!
त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो लेकीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतेया बाप वेटरला म्हणाला हा डोसा बांधून द्याल का मी आणि माझी बायको दोघेभी अर्धा अर्धा खाऊ, घरी तिला कुठं असं खायला मिळत,..!
आता माझ्याही डोळ्यात खळकन पाणी आलं, अतिशय गरिबीतही माणुसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात, तुम्हाला असं कोणी आढळलं,तर एखादा मसाला डोसा अवश्य खायला घाला..
🙏🏻
आंतरजालावरून साभार - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook