सिकंदर आणि डायोझेनस एकाच देशाचे.

सिकंदरला बेफाट सत्ता हवी होती, जग काबीज करायचे होते. त्यासाठी तो कष्ट घेत होता, लढत होता, जगभरावर स्वारी करत होता.


डायोझेनस हा फकीर होता. आपल्या गरजा कमी करत करत जगत होता. एक दिवस जनावरे जगातात तर आपण का नाही याचा विचार करून त्याने आपली वस्त्रे देखील त्यागून टाकली. पाणी प्यायला एक भांड यापलीकडे त्याची संपत्ती नव्हती. एका कुत्राला वाहत्या पाण्यात तोंडाने पाणी पितांना बघून त्याने ते भांडे देखील फेकून दिले.

एका रम्य सकाळी समुद्र किनारी डायोझेनस सकाळचे कोवळे ऊन खात बसला होता. सिकंदर तिथे आला, त्याची सावली डायोझेनसवर पडली. त्याला असे विवस्त्र बघून सिकंदर म्हणाला,

-मी सम्राट आहे इथला, माग काय मागायचे ते.
-मला काहीही नको आहे.
-अरे माग, असे काहीही नाही जे मी तुला देऊ शकणार नाही.
-नकोय मला काहीही.
-अरे पण का?
-कारण तू मला जे हवे ते देऊ शकणार नाहीस.
-असे काय आहे जगात.
-मित्रा बाजूला हो, तुझ्यामुळे माझ्या अंगावर येणारे हे कोवळे ऊन अडले आहे. हे कोवळे ऊन मला फक्त सूर्य देऊ शकतो, कितीही अब्जाधीश तू असलास तरी नाही. आयुष्यात काहीही करता आले नाही तरी चालेल पण काळजी घे.
-कसली?
-कोणाच्याही आयुष्यात येणारा प्रकाश तू अडवू नकोस कारण प्रकाश देण्याची क्षमता तुझ्यात नाही !!!!

 जो प्रकाश आपण देऊ शकत नाही तो हिरावून घेऊ नये आणि माणूस म्हणून मिळालेल्या या जीवनाचे शक्य तितकी मदत करून सार्थकी लावावे...✍️✍️🙏🏻🙏🏻

Post a Comment Blogger

 
Top