आज बऱ्याच दिवसांनी
लाख प्रकाश पडलाय
कारण तू येणार आहे
तू येणार म्हणून
क्षण क्षण मला स्पर्शून जातोय
वाटतय ........ आज मी जगतेय
तू ज्या वाटेवरून येतोय
तिकडे मी एकटक पाहतेय
माझ्या काळजाचे ठोके तीव्र झालेत
कारण तू आलाय ........


तू येताच अलगद माझ्या पापण्या  झुकल्या
आणि तुझ्या एका प्रेमळ नजरेने
मनातली पाकळ्या  खुलल्या
तू फक्त प्रेमाने माझ नाव घेताच
हृदयावर असंख्य चांदण्या चमकल्या
एक नवा उत्साह एक नवी संवेदना
माझ्या मध्ये आली आहे
याच... याच क्षणाची.......
तुझ्या येण्याची
मी वाट बघत होते ........

साभार- कवियेत्री : प्रिया उमप

Post a Comment Blogger

 
Top