स्त्री चा सगळ्यात सुंदर अन् नाजूक दागिना म्हणजे तिच्या हातातील बांगड्या.. स्त्री ची जरा जरी हालचाल झाली की त्यांची नाजूक अशी किणकिण सुरू....अहाहा किती सुंदर वाटते ते किणकिण ऐकायला..

बांगड्यांची किणकिण जरी सेम असली तरी त्यातील हात मात्र खूप मॅटर करतात..

आईच्या हातातली बांगड्यांची किणकिण म्हणजे आमच्या साठी लहानपणी एक खुप सुंदर संगीतच जणु..अन् त्याहून ही जास्त एक सुरक्षिततेची भावना.. किणकिण ऐकायला येतेय म्हणजे आई इथेच आसपास आहे याची जाणीव.... खूपदा दिवसाची सकाळ ही त्याच किणकिण आवाजाने व्हायची ...... त्या किणकिण आवाजाची सर कशालाही नाही..

क्रमश:

लेखक: राजस 

Post a Comment Blogger

 
Top