वास्तूशास्त्र टिप्स - Vastu Shastra Tips
१. गोराचनचा टिळा लावणे किंवा हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते.
२. गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी.
३. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.
४. वायव्य दिशेला - राधाकृष्ण , लक्ष्मीचा फोटो लावावा.
५. घरातील सर्व देवांना हळ्कुंडाची माळ घालणे.
६. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.
७. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी
८. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.
९. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.
१०. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.
११. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.
१२. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.
१३. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.
१४. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.
१५. 'श्री स्वामी समर्थ' हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.
१६. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे.
१७. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.
१८ घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.
१९. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.
२०. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे " ॐ नमो विष्ण्वे नम: " जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णुसहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी.
२१. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.
२२. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.
२३. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात , लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व "ॐ नम: शिवाय " या मंत्राचा १०८ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.
२४. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. आर्थिक लाभ होतो.
२५. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.
२६. ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची, मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी १२ व्या अध्यायाच्या पहिल्या १६ ओव्या वाचाव्या.(झेराक्स करून घ्याव्या).
२७. यश्च्याय कुबेराय वैष्णवाय, धन - धान्यधिपतये धन - धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ! ऊत्त्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा.
२८. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून "हनुमान चालिसा" चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल.
२९. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.
३०. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही.
३१. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.
३२. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
३३. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.
३४. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र.
३५. रोज रात्रौ पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्रय विनाकटकट निघून जाते.
३६. दध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.
३७. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही. उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.
३८.उपवास करून - शरीरशुध्दी होते,
यात्रा करून - शरीर बलवान होते,
जप करून - मानसिक विकास होतो,
अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते,
धन, रत्न जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राह्ते,
दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,
वास्तुशास्त्रानुरूप - घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,
रत्न वापरल्याने - मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,
रोज ध्यान करून - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.
३९. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.
अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील.
४०. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.
४१. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे. गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.
४२. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे.
४३. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.
४४. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.
४५. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये.शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे.
४६. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते.
४७. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशीकाष्ठाची पाने घेऊन 'ॐ नमो विष्णवे नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते.
४८. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.
४९. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत. घरात प्रसन्नतेचे वातवरण राहील.
५०. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
५१. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात "श्री श्री" मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.
५२. धनदायी नक्षत्र मृग , पृष्य , मघा , मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो.
५३. लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे.
५४. गुरूपुष्य किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र, श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाचवेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी.
५५. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये.
५६. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्व्च्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावा.
५७. सर्व मनोरथ पुर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठण करावे
'श्रीव्यंकटेश स्तोत्र' हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते.
अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे.
५८. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.
५९. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको. पिवळा असावा.
६०. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .
६१. रोज सकाळी पहिली भाकरी गायीला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.
६२. कोणाकडून कर्ज घेतले तर, त्यातले ५-१० रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते.
६३. लक्ष्मीसाधना: पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री १२-१८ वाजता चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र १२ वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे. जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुऊन पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र १२ वेळा जपावा. गायत्री मंत्र: "ॐ भुर्भव: स्व: तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धिमही धियोयोन: प्रचोदयात"
६४. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.
६५. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये.
६६. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया (पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ) जाळाव्यात.
६७. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो.
६८. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते?
उत्तर: बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा एकाक्ष नारळाला 'चिंतामणी' नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात.
६९. ध्यान-चिंतनाचे महत्त्व का मानले जाते.?
उत्तर: महादेव शंकर असे सांगतात की "मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनाची आवश्यकता फार असते" म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला फारच महत्त्व आहे.
७०. सर्व जगतामध्ये भगवंत कोणत्या रूपात आहे?
उत्तर: पाण्यामध्ये रस, सूर्य आणि चंद्र यामध्ये प्रकाश, सर्व वेदांमध्ये ओंकार, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये पुरुषार्थ, पृथ्वीमध्ये पवित्र गंध, अग्नीमध्ये तेज सर्व प्राणिमात्रांमध्ये जीवनशक्ती, तपस्यांमध्ये तप, सर्व प्राणिमात्रांचे अनादी बीज, बुध्दीमान लोकांमधील बुध्दी, तेजस्वी लोकांमध्ये तेज, या सर्वामध्ये भगवंत आहे.
७१. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये.
७२. मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णत: वर्ज्य करावेत.
७३. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.
७४. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते.
७५. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करुन बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. सार्थचरक संहितेमध्ये या संबधीचा स्पष्ट उल्लेख आहे.
७६. चुकूनसुध्दा कोणत्याही प्रकारचे कॅक्टस किंवा काटेरी रोपटे, फ्लॅटमध्ये लावू नये. परंतु एखाद्या इसमास अशा प्रकारच्या रोपटयांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील .
७७ . वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.
७८. काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.
७९. ज्याला संतती होत नाही, अशा व्यक्तिला, अश्र्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात कोणतीही शक्ती प्राप्त करुन घ्यावयाची असेल तर अधिक शक्तीमान अशा अश्र्वत्थाचे पूजन केल्यानेे व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोचित लाभ प्राप्त होतो. (त्याचबरोबर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचारही करणे)
८०. घडयाळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य?
उत्तर: घडयाळ ही एक जिवंतपणा दाखविणारी (लिविंग इनटायटी) वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घडयाळे त्वरित दुरूस्त करावीत किंवा बदलावीत.
८१ . बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात?
उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.
८२. शरीरास अनुकूल व निर्सगास अनुरूप अशी वास्तुरचना ज्या नियमांनी करता येते त्यास वास्तुशास्त्र म्हणतात.
८३. ज्याप्रमाणे आर्युवेदाच्या नियमातून कायाकल्प होतो. योगशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो. त्याचप्रमाने वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास भाग्यकल्प होतो. वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणांवर अवलंबून असून आपल्या राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयाची प्रचिती येताना दिसते.
८४. शंभर टक्के गुणसमुच्चयाची वास्तू ही कविकल्पनाच असल्यामुळे सर्वसाधारण ५०%-६०% गुणोत्कर्ष असणारी वास्तु असणे मात्र आवश्यक आहे.
८५. 'खाण तशी माती' अशी म्हण आपण वापरतो किंबहुना वास्तुशास्त्रीय म्हणीत 'खाण तशी माती' असे म्हणता येईल.
८६. जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायु व स्वास्थ्याची ती पावतीच आहे.
८७ . एका मोठया संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमलासमान फुलून वाटचाल होईल.
८८. क्षणाक्षणाला विद्या मिळवावी आणि कणाकणांनी धन मिळवावे . क्षण वाया गेला तर कुठले धन?
८९. दारिदर्य आणि मरण ह्यामधून मला मरण आवडते. मरणाची यातना अल्प असते, पण गरिबीची यातना न संपणारी असते . (म्हणून लक्ष्मीची साधना करा)
९०. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारत मंगल कलशाची टाइल बसवावी.
९१. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
९२. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा. हा तोडगा स्वत:च्या अनुभवाने सांगतो)
९३. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा.
९४. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे
'सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.
९५. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.
९६. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी 'नवनाथ भक्तिसार' २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
९७. नोकरीधंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा
ॐ कृष्णाय वासुदेवाय रहये परमात्मने
प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: ।
९८. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा
९९. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
१००. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
१०१. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे.
१०२. वर्षातून एकदा तरी घरात उदकशांत करावी.
१०३. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत.
१०४. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.
१०५. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत.
१०६. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची 'योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा.
१०७. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.
१०८. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
१०९. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प'्रणयाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात.
११०. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत.
१११. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.
११२. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील.
११३. दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा "हरिओम""हरिओम" म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. "हरिओम" म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो.
११४. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.
११५. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी.
११६. झोप येत नाही? हा मंत्र बोला (२१ वेळा)
संपुट मंत्र
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ॥
११७. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरीत बदलणे, एखाद्या दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैॠत्य स्त्री, पश्चिम नैॠत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात
११८. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये.
११९. "श्री"घरात स्थापून 'श्रीसूक्त' चा किमान एक पाठ रोज करावा.
१२०. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये.
१२१. देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.
१२२. ेकराग्रे वसते लक्ष्मी:
करमूले सरस्वती ।
करमध्ये तु गोविन्द:
प्रभाते करदर्शणम॥
अर्थ : हाताच्या टोकावर (बोटांवर) लक्ष्मी असते, हाताच्या मुळाशी (मनगटालगत) सरस्वती असते, तळहाताच्या मध्यावर श्रीगोविन्द असतो. म्हणून सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे.
१२३. मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.
१२४. एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुध्द पाणी भरावे. त्यात गोमूत्र, कापूर, हिंग पावडर, वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे दोन चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास-बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ-संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग ४५ दिवस करावा.
१२५. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. 'यमघंट' योगावर गृहप्रवेश कधीही करू नये.
१२६. वास्तूमध्ये महारुद्र, लघुरुद्र पूजन करावे.
१२७ उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत. करण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही !
१२८. आपल्या नावाची पाटी सेप्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी.
१२९. आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये (सेकंड हॅंड) असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो. आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलला आहे.
१३०. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पुजा करावी.
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook