एक दिवस तु पण खुप रडशील ..आणि बोलशील…होता ‪‎एक‬ वॆडा...जो फक्त मला
‪मिऴवण्यासाठीचं‬ वॆडा होता..



दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...यात फरक एवढाच की, दुखनारया मनाला आवर
घालता येत नाही आणि गुलाबाला, तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.



हसण्याची इच्छा नसली…तरी हसावं लागतं, कसं आहे विचारलं…तर मजेत आहे
म्हणावं लागतं…जीवन हे एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं
लागतं.


कधी कधी पाखराला पिंजर्याची इतकी सवय होते की, पिंजर्याचं दार तुटलं तरी
पाखरू उडायचं विसरलेल असते...



पहातेस कशाला मागे वळुनि आता ? संपला ना पोरखेळ प्रीतीचा अपुला ? ढाळू
नकोस ती आसवे खोटी खोटी …विसरून सारे ,धरुया मार्ग अपुला!



मन गुंतायला वेळ लागत नाहीमन तुटायलाही वेळ लागत नाही… वेळ लागतो तो
गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला



सांगितले खूपदा तुला …,तरीही अर्थ प्रेमाचा कळलाच नाही …प्रेमात सर्वात
महत्वाचा असतो तो विश्वास …,तोही माझ्यावर तु ठेवलास नाही -



आभाळं भरले आहे…अगदी जसे होते तु जाताना…पण आता तेही बरसत नाही…उगीचच कारण नसताना…



माहीत नाही पुन्हा कधी भेटु…वेगळ्या रस्त्यावर चालताना…अन जुळतील का
आपल्या तारा…वेगळ्या जगात राहताना…



शुन्यच आहे आयुष्य माझे…उणे तु असताना…धरलास का हात सांग तु…सोडुनच जायचे असताना…



शोधल होत तू मला , या माणसांच्या गर्दीतून आपल समजून...तूच हरविलास या गर्दीत
आज मला विसरून .




आज काल वाटेवरचा मोगराही नेहमीसारखा फुलत नाही, कदाचित त्याला ही समजल
असेल,की तू माझ्याशी बोलत नाहि



डोळ्यातील आसवे लपवत..ओठांना हसत ठेवायचे..तुझ्यावर प्रेम करून सुदधा
तुझ्यापासून लपवायचे .






मी तिच्यावर प्रेम करतो..तिच्यासाठी जिंकलेले डाव पुन्हा पुन्हा
हरतो..प्रत्येक क्षण तिच्याविषयी बोलतो..आठवणीत तिच्या गुपचूप रडतो



तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे..अग वेडे कस सांगू ..तेच तर
माझ्या जगण्याचा एक आधार आहे.



तु मला जेवढं खोट बोललीस ना त्यातलं "‎मी तुझीच आहे‬..'"हे वाक्य माझ फेवरीट होतं.




आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top