आजकाल तो माझ्या खिडकीतून आत डोकावतो,
दिसते का मी कुठे हे चोरून पाहतो!
कधी जाते मी बाहेर नि कधी येते मी घरी,
याची आहे त्याला information सगळी!
मी बाहेर पडते तेव्हा तो समोरच उभा असतो,
bus stop पर्यंत माझा पाठलाग तो करतो !
मी बाजूने जाते तेव्हा मलाच पाहत बसतो,
माहित नाही माझ्यावर इतका का तो मरतो!
तसा तो आहे साधा सिम्पल पण दिसतो खूप छान,
डोळे त्याचे निळे नि रंग गोरापान!
ground मध्ये मुलांसोबत त्याला खेळताना जेव्हा मी पाहते,
अगदी खर सांगते ....मी भान हरपून जाते !
पावसात भिजल्यावर त्याचे केस जेव्हा तो झाडतो,
आईशप्पथ सांगते... खूपच handsome वाटतो!
नेहमी माझ मन त्याच्याच मागे जात पळत,
प्रेमात पडले की काय त्याच्या मलाच नाही कळत!
त्याच्यासोबत पहिले मला की आई खूप ओरडते,
तरीसुद्धा चोरून चोरून मी त्याला बिस्कीट खायला घालते!
मला पहिले की तो शेपूट जोरात हलवतो,
खरच माझा TOMY मला खूप आवडतो!
-मयु
Post a Comment Blogger Facebook