तिचा मित्र

रिमझिम पाऊस,
त्यात तिच्या भिजण्याची हौस.
मग पावसात भिजताना मला विसरणं,
कधी विसरून पावसाला मला बिलगणं.


पावसासोबत ती असताना मला,
आणि माझ्यासोबत ती असताना पावसाला वाटणं गैर.
आणि आणखिनच त्याच माझं वाढत गेलेलं वैर.


तिचं मुसमुस रुसणं ,कधी फिकटस हसणं,
तिने ये म्हणताच याने बरसणं,
मग मला येता राग मी तिला छत्रीत घेणं,
तेव्हा मला आवडतं त्याच ते तरसणं.


तिचं हसणं, त्याच बरसणं,
माझ्या आधी पोहचता तो, माझं ते धूसमुसनं,
माझं असं फसणं, त्याचं त्याला हसणं,
मग तिनेच उघडून छत्री, माझं राग पुसणं.



ती नसताना एक दिवस पाऊस आला खाली,
म्हणतो पुरे झालं धुसफूस आता बास झाली.
अरे तिची माझी जरा वेगळीच विण आहे,
ती तुझी आजकालची पण माझी तिच्या बालपणापासूनची मैत्रीण आहे.

मी दोन क्षण बोललो तर तुला वाईट वाटत.
तू उघडून छत्री तिला जवळ घेतो तेव्हा, माझ्या मनी काय दाटत.
अरे मी चार महिन्याचा पाहुणा आहे,
तरी ऋणानुबंध आमचा फार जुना आहे.
आज मला शेवटचं तिच्यामध्ये मिसळू दे,
उद्या पासून मी नसेन येईल वेगळा ऋतू,
चल जातो मी येईन पुन्हा तोवर शपथ तुला तिला सांभाळ तू.


तिची चाहूल लागताच हा निघून जातो,
एक हळवा आसू डोळी माझ्या रहातो,
येऊन ती विचारते "तुला काय झाले",
मी म्हणतो काही नाही "ढग बरसून गेले".


मग येतो पाऊस त्याची पुरवण्या हौस,
ती म्हणते उघड छत्री मी सांगतो आज नको मागुस,
ते ऐकून पाऊस आनंदात बरसतो,
डोळा मारून मला गालातल्यागालात हसतो.


आता आठवत राहत ते त्याचं कोसळणं,
त्याच्यासोबत  तिचं ते हसणं कधी रुसणं,
पण आता छळत राहत हि असताना ते त्याचं नसणं.


...........अमोल

Post a Comment Blogger

 
Top