तुझे ते चिडून जाणे माझ्यावर
मग हळूच स्वत:ला सावरणे...
कधी खळाखळा हसता हसता
खोड्या माझ्या त्या काढणे...
लटक्या माझ्या रागासाठी
तुझे तास न तास मनवणे...
धरिता अबोला मी जर
तुझे ते कासाविस होणे...
चुक झाली कितीही मोठी
तरीही तुझे माफ़ करणे...
डोळ्यात येता आसवाचा पुर
तू हलकेच माझी टीपे पुसणे...
चिडले असता कधी मी
ते इवलासा चेहरा करणे...
फुलासारखे जपता जपता
सगळा त्रास स्वत:च घेणे...
जरी असले मी सामान्य
तुझे मला ते ख़ास बनवणे...
स्वप्नसख्या पुरे आता स्वप्नातल्या भेटी
कधी रे होईल तुझे वास्तवात येणे...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook