ती म्हणते...
बदल...
विचार बदल...
आचार बदल...
स्वत:लाच पूर्णपणे बदल...
अरे सगळंच बदलायचं तर
माझ्यातला मी राहणार काय?
आणि इतकंच जर बदलायची गरज असेल
तर प्रेमात पडताना माझ्यात तू असे पाहिलेसच होतेस काय?
 

नक्की माझ्यावर प्रेम करतेस
की त्यात काही व्यवहार शोधतेयस?
एखाद्या व्यक्तीला ती आहे तसंच स्विकारायचं असतं.
नसेल स्विकारणं जमत
तर कायमचंच विसरायचं असतं.
आता हे तुझं तूच ठरव...
तुला नक्की मी हवा आहे
की माझ्यातील बदल???

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top