तु माझी तु माझी म्हणत दिवस गेले
पण मी मात्र तुझा कधीच नाही झालो
एक रात्र गेली तुझ एक स्वप्न गेलं
मी मात्र तुझ्या स्वप्नांत कधीच नाही आलो.
मी तुझ्यासाठी कधीच काही नाही केल
प्रत्येक प्रयन्तात अपयशी मी झालो
खरचं तुला मी कधीच काही नाही दिल
तुझी प्रत्येक इच्छा काळजात साठवत गेलो.
सांर आयुश्य बढाया मारण्यात गेल
नेहमी खोटया स्वप्नांत मी जगत गेलो
आज मागे वळून पाहील तर काहीच नव्ह्तं
प्रत्येक वळनावर काही ना काही हरत गेलो.
फ़क्त एक तुझी सावली माझ्या सोबत होती
पण मी तीचीही साथ नाही देवु शकलो
वाटंल तिच्यासोबत आयुश्य जगेन मी आता
पण तीलाही मी आज काळॊखात घेवुन गेलो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook