तुझी वाट बघत मी
खिडकीत उभी असावी.....
तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा
पाठमोरीच राहावी...
मोगऱ्याचा गजरा,
तू हळूच माझ्या केसात माळतांना
मीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........
तुझे हात माझ्या कमरे भवती
आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....
हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....
मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....
अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....
Post a Comment Blogger Facebook