'गृहिनी गृहमुच्यते' अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं.

पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. वैद्यकीय प्रतिष्ठा यांच्या स्पर्धेतच बहुशः गुंतला आहे. तेव्हा गृहिणीनंच थोड्या धिटाईनं आजीबाईचा बटवा हातात घेतला पाहिजे.

बटवा आजीबाईचा असला तरी ती शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे.

'ताप येणे' ही अवस्थान घ्याना ! बहुसंख्य गृहिणी 'अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही' असं सांगतात. खरं तर प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टरलोक बरेचदा ओळ्खू शकतात. ताप नॉर्मलला येतो, की नाही यालाही फार महत्त्व असतं. ताप कमी आला यापेक्षा तो ९७ डिग्री किंवा ९७.५ डिग्री फॅ. पर्यंत एकदा तरी आला की नाही हे महत्त्वाचं ठरतं तसम्च तापाबरोबर डोकेदुखी, अंगदुखी थंडी वाजून ताप येणं, डोळ्याची आग होणं इत्यादी अन्य तक्रारी नोंद करावी.

त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या.

गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. 'संशमनी वटी' नावाच्या गोळ्याही मिळतात.

याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा.

तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला कडेकोट, बंदोबस्तात न ठेवता त्याला मोकळी हवा व स्वच्छ उजेड मिळेल याची काळजी घ्यावी.

या छोट्याशा लेखात प्रत्येक रोगाबद्दल अशी माहिती देणं शक्य नाही. पण गृहिणीनं हे समजूनं घेतले पाहिजेकी आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.

(१) आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र. वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.

(२) नित्योपयोगी निवडक औषधे . श्री. म. गो. मोडक.

(३) गृहवैद्य - लेखक डॉ. र. कृ. गर्दे.

सामान्यतः आढलणारी तक्रार, त्यावरील आयुर्वेदीय, बाराक्षार किंवा होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी व अगदी घरगुती असे उपचार यंचा तक्ता दिला आहे. त्याचा उपयोग करतानाच घरात पुढील गोष्टीही ठेवणं आवश्यक आहे.

थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे.

हे सर्व सामान व पुस्तके या सर्वांचा खर्च सुरुवातील एकदम १५० ते २०० रु. असा जास्तीत जास्त केला, तरी डॉक्टरांची बिले दिवसेंदिवस कमी होत गेलेली आढळतील, एवढं निश्चित !

 

तक्रार :- ताप येणे

आयुर्वेदीय :-

त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस

बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

फेरम फॉस काली मूर अ‍ॅकोनाईट

अ‍ॅलोपॅथी :-

क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप

घरगुती उपाय :-

कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

 

तक्रार :- सर्दी

आयुर्वेदीय :-

त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव

बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

फेरम फॉस, नेट्रम मूर

अ‍ॅलोपॅथी :-

बेनेड्रिल

घरगुती उपाय :-

आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

 

तक्रार :- खोकला

आयुर्वेदीय :-

अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी

बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर

अ‍ॅलोपॅथी :-

ग्लायकोडिन बेंझोसिन

घरगुती उपाय :-

लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

 

तक्रार :- जुलाब

आयुर्वेदीय :-

संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी :-

सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :-

सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

 

तक्रार :- आव (रक्त पडत नसेल तर)

आयुर्वेदीय :-

संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी :-

मेट्रोजिल
घरगुती उपाय :-

मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

 

तक्रार :- उलट्या

आयुर्वेदीय :-

प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :-

स्टेमेटिल
घरगुती उपाय :-

मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

 

तक्रार :- तोंड येणे

आयुर्वेदीय :-

कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
अ‍ॅलोपॅथी :-

ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :-

जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

 

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन

आयुर्वेदीय :-

प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अ‍ॅलोपॅथी :-

झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
घरगुती उपाय :-

भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

 

तक्रार :- जंत कृमि

आयुर्वेदीय :-

कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- सीना
अ‍ॅलोपॅथी :- हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

 

तक्रार :- सांधे दुखी

आयुर्वेदीय :-

सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-

ब्रुफेन
घरगुती उपाय :-

सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

 

तक्रार :- मूत्र विकार

आयुर्वेदीय :-

चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-

अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :-

धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

 

तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )

आयुर्वेदीय :-

कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-

क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय :-

लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

 

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )

आयुर्वेदीय :-

ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

काली फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-

काम्पोज
घरगुती उपाय :-

वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

 

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी

आयुर्वेदीय :-

सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

हिपार सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-

इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय :-

अमसुलाचे पाणी

 

तक्रार :- भाजणे, पोळणे

आयुर्वेदीय :-

शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

कन्येरिस मलम
अ‍ॅलोपॅथी :-

बर्नाल
घरगुती उपाय :-

तूप लावणे

 

तक्रार :- मुरगळणे लचकणे

आयुर्वेदीय :-

लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

अर्निका मलम पोटात अर्निका
अ‍ॅलोपॅथी :-

आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय :-

रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

 

तक्रार :- जखमा

आयुर्वेदीय :-

शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अ‍ॅलोपॅथी :-

बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय :-

स्वच्छ खोबरेल तेल

 

तक्रार :- दातदुखी

आयुर्वेदीय :-

लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अ‍ॅलोपॅथी :-

लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-

तुपाचा बोळा

 

तक्रार :- कानदुखी

आयुर्वेदीय :-

सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

काली सल्फ नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-

वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-

लसणीचे तेल कानात घालणे

 

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )

आयुर्वेदीय :-

आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन सारिवाद्यासव

बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-

कल्केरिआ फॉस नेट्रम सल्फ

अ‍ॅलोपॅथी :- ...

घरगुती उपाय :-

हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी

- वैद्य (कु.) निर्मला ग. जोशी B.A.M. and S. (Pune)


Post a Comment Blogger

 
Top